राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली

On: September 16, 2024 2:45 PM
Rahul Gandhi
---Advertisement---

Rahul Gandhi l विधानसभा निवडणूक जवळ येताच राज्याच्या राजकारणात गदारोळ माजला आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. मात्र आता या घटनेचे पडसाद देखील राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

…तर त्याला तब्बल 11 लाखांचं बक्षीस देणार :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला तब्बल 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील गोष्ट ओठावर आली असल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणले आहेत. मात्र आता संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे.

Rahul Gandhi l फेक नरेटिव्ह करून दलित समाजाची मतं घेतली :

महाराष्ट्र राज्यात आणि देशात आरक्षणाची आग चांगलीच पेटली आहे. कारण आता मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीनं उभं करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं होत. मात्र आता असं असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आमच्या देशातलं आरक्षण मला संपवायचंय असं खळबळजनक वक्तव्य केलं होत. तसेच काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांच्या पोटातील मळमळ त्यांनी शेवटी ओकून दाखवलीच आहे.

याशिवाय संविधान देखील धोक्यात आहे, संविधानात आपलं आरक्षण संपवणार आहे, असा फेक नरेटिव्ह सध्या सर्वत्र पसरवला आणि दलित समाजाची मतं घेतली आणि अशातच आज आरक्षण संपवण्याची भाषा ते करत आहेत असं आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.

News Title- MLA Sanjay Gaikwad Statement On Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या-

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now