शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका

On: September 16, 2024 1:39 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण पसरले आहे.

पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादीचा कॅन्सर झाला :

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी हा कॅन्सर झाला आहे. तसेच राज्यात छत्रपती शिवाजी महाजांनी दिलेली तेजाची झळाली ही देखील शरद पवारांमुळे हरवली आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सवाल देखील उपस्थित केला आहे. शरद पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar l पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? :

यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार म्हणतात ना सत्ता आमच्या हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तर तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे तब्बल 50-60 वर्षे आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी देखील शरद पवारांमुळंच हरवली आहे. याशिवाय शरद पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा सध्या मिळाला आहे. तो बदलवून शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

News Title- MLA Gopichand Padalkar Statement On Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या-

स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!

राज्य सरकार धनगर, धनगड संदर्भात मोठा निर्णय घेणार! आता यापुढे…

शनीदेवाच्या कृपादृष्टीमुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत, मिळणार अमाप पैसा

UPI ​​व्यवहाराची मर्यादा वाढली; एका दिवसात ‘इतके’ पैसे ट्रान्सफर होणार

ऐश्वर्याने काढली वेडिंग रिंग, अभिषेकपासून घेतली फारकत?; व्हिडिओच आला समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now