यवतमाळ | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू कायम त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेत असतात. दरम्यान बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण निधी खर्चाचं वाटप केलं नाही म्हणून यवतमाळच्या उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना दम दिला आहे
काय आहे प्रकरण?
निधी खर्च का केला नाही, म्हणून शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी मुख्य अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना चांगलंच सुनावलं.
बच्चू कडू म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांचा निधी का खर्च केला नाही?” असे एक न अनेक प्रश्न विचारत अधिकाऱ्यांवर बच्चू कडू चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
दिव्यांगांचा निधी वाटायला जीवावर येतं का? असा सवाल बच्चू कडू यांनी त्या अधिकाऱ्याला विचारला. 1 लाख पगार घेता पण डोकं लावत नाहीत, असे म्हणत संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतले आहे.
जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेल असा दम बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला दिला. पुढे ते म्हणाले की, त्यानंतर जर कमी निधी दिला तर तिथं येऊन वांदे करेल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी
“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”
Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल
‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य






