‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?

On: March 20, 2024 1:43 PM
Mirzapur 3
---Advertisement---

Mirzapur 3 | ‘मिर्झापूर’ या वेब सिरिजचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचे दोन पार्ट सुपरहीट झाले आहेत. आता लवकरच ‘मिर्झापूर 3’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या पार्टसाठी चाहते प्रचंड आतुर आहेत. मात्र याचे पोस्टर रिलीज होताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याच्या निर्मात्यांवर चाहते आपली भडास काढत आहेत. झालं असं की, 19 मार्चरोजी ‘मिर्झापूर3’ चा टीझर सोशल मीडियावर रिलीज होणार असल्याची माहिती होती. मात्र या दिवशीही फक्त पोस्टर रिलीज करण्यात आल्याने नेटकरी भडकले आहेत.

‘मिर्झापूर 3’ चे पोस्टर रिलीज

19 मार्च रोजी सायंकाळी याच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, जो या सीरिजचा टीझर नव्हता. या व्हिडीओमध्ये फक्त पोस्टर आणि छोटीशी झलक दिसली. त्यातच मुन्ना भैय्या म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा देखील यात दिसला नाही. त्यामुळे टीझर पाहून चाहते संतापले आहेत.

मिर्झापूरचा ‘गुड्डू पंडित’ म्हणजेच अभिनेता अली फजलने आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ टाकला होता. त्यामुळे ‘मिर्झापूर 3 ‘ (Mirzapur 3) चा टीझर 19 मार्चला रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र चाहत्यांचा सपशेल हिरमोड झाला आहे.

‘मिर्झापूर 3’ मधून मुन्ना भैय्या गायब?

त्यातच प्रसिद्ध भूमिका असलेला मुन्ना भैय्या स्टारकास्टमध्ये नाहीये. त्यामुळे तो तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. मुन्ना भैय्या नसतील तर आम्ही सिरिज बघणारच नाही, अशी भूमिकाच चाहत्यांनी घेतली आहे.

दरम्यान, ‘मिर्झापूर 3’ (Mirzapur 3) चे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये एक खुर्ची दिसत आहे आणि ती पेटलेली दिसली आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘सिंहासनावर आपला दावा मांडत, गुड्डू आणि गोलू एका नवीन स्पर्धकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. या आगीत ते जळून खाक होतील की, शक्तीशाली सत्तेची खुर्ची कायमची नष्ट करतील?’ ही सिरिज नेमकी कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाहीये.

यामध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, मनु ऋषी चड्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चाहते आता यासाठी आतुर आहेत.

News Title : Mirzapur 3 poster release

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज

आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Join WhatsApp Group

Join Now