महागाईचा झटका! मटण, चिकननंतर दुधाच्या दरातही वाढ 

On: March 15, 2025 9:36 AM
Milk and Mutton Price Hike 
---Advertisement---

Milk and Mutton Price Hike | धुळवडीच्या काळात महागाईने कहर केला आहे. सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक आधीच त्रस्त असताना, आता मटण, चिकन आणि दुधाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या किंमतवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (Milk and Mutton Price Hike)

राज्यात मटणाचे दर गगनाला भिडले

मुंबईत मटणाचा दर 800 ते 850 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रति किलो ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्येही मटण व चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

विशेषतः, धुळवडीच्या दिवशी मटण खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे अनेकांनी कोंबडीऐवजी मटणाकडे अधिक कल दाखवला, त्यामुळे मागणी वाढली आणि त्यानुसार दरही वाढले.

शेळीपालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची विक्री, कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे मटण महागले आहे.

दुधाच्या दरातही वाढ 

मटणाच्या दरवाढीनंतर आता दुधाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात दुधाच्या उत्पादनात घट झाल्याने आणि आईसक्रीम व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दूध भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान मिळवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अन्नधान्य, दूध, मटण आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. महागाईचा हा तडाखा आगामी काळात आणखी वाढणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Title : Milk and Mutton Price Hike 

 

Join WhatsApp Group

Join Now