उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; शिक्षण फक्त दहावी

Milind Narvekar Property | राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणूक, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या असून सध्या सर्वांचं लक्ष हे विधान परिषदेकडे लागलं आहे. 12 जुलैरोजी यासाठी निवडणूक होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचे विश्वासू स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे.या अर्जातून त्यांची एकूण संपत्ती आता समोर आली आहे. मिलिंद नार्वेकर हे दहावी पास असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड (Milind Narvekar Property) झालंय.निवडणूक शपथ पत्रातून याची माहिती समोर आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांची एकूण संपत्ती उघड

नार्वेकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण व त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती दिली आहे. नार्वेकर यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं यातून उघड झालं आहे. तर त्यांचे शिक्षण हे 10 वी झाले आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाहीये.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे 45 हजार रुपये रोख तर त्यांच्या पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात सध्या 74 लाख 13 हजार 243 रुपये आहेत. तर पत्नीच्या बँक (Milind Narvekar Property) खात्यात 8 कोटी 22 लाख 118 रुपये इतकी रक्कम आहे. याशिवाय नार्वेकर यांनी बॉण्ड्स आणि म्युचल फंडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे.

जमिनी तसेच अनेक पॉलिसीमध्ये गुंतवणूक

नार्वेकरांनी 50 तर त्यांच्या पत्नीने 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 कोटी रुपये बॉन्ड आणि म्युचुयल फंडमध्ये गुंतवले आहे. तर पोस्ट ऑफिस व पॉलिसीमध्ये देखील मिलिंद नार्वेकर यांची गुंतवणूक आहे. तब्बल 3 लाख 68 हजार 729 रुपये त्यांनी पोस्ट ऑफिस व पॉलिसीमध्ये गुंतवले आहेत. त्यांच्या पत्नीने देखील 68 लाख 88 हजार 558 रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे जमिनी देखील आहेत. कोकण, बीड आणि मुरुड येथे त्यांची जमीन आहे. मुरुडमध्ये त्यांची 74.80 एकर जमीन असून त्यात त्यांच्या पत्नीचा 50 टक्के वाटा आहे.याचबरोबर मुंबईत मालाड व बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचे घर असून पत्नीच्या नावावर अलिबाग येथे फार्म हाऊस आहे.

शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे 4 कोटी 17 लाख 63 रुपयांची स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावे 11 कोटी 74 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 355.94 ग्रॅम सोने असून त्याची बाजार भावाप्रमाणे 24 लाख 67 हजार 981 रुपये किंमत आहे. तर चांदी 12.56 किलोग्रॅम आहे. त्याची किंमत सुमारे 9 लाख 74 हजार 656 रुपये आहेत. यासोबतच त्यांच्याकडे मौल्यवान हीरे देखील आहेत. नार्वेकर यांच्या पत्नीकडे 71 लाख 28 हजार रुपयांचे दागिने आहेत. शेअर मार्केटमध्ये देखील त्यांची गुंतवणूक आहे. श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनीमध्ये त्यांचे 50 टक्के शेअर आहेत. यात 10 कोटी (Milind Narvekar Property) रुपयांची गुंतवणूक नार्वेकर यांनी केलीये. तर, त्यांच्या पत्नीने 31 कोटी 25 लाख 33 हजार रुपयांची गुंतवणूक शेयरमध्ये केली आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्यावर 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज आहे. तसेच 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 बँकेचे कर्ज आहे. यासोबतच मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही.

News Title – Milind Narvekar Property

महत्वाच्या बातम्या-

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल!

जुलै महिन्यात लाँच होणार ‘या’ भन्नाट कार; पाहा यादी

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं

चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?