मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची तब्बल ‘इतक्या’ घरांसाठी नोंदणी सुरू; ‘या’ भागात असणार घरं

On: March 30, 2026 12:45 PM
MHADA Recruitment
---Advertisement---

MHADA Lottery 2026 | मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या मुंबई मंडळाने 2026 साठी मोठी घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीमध्ये तब्बल 2640 घरांची विक्री करण्यात येणार असून विविध उत्पन्न गटातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. (MHADA Mumbai Homes)

मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाच्या लॉटरीद्वारे परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक या लॉटरीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

मुंबईतील कोणत्या भागात उपलब्ध आहेत घरे? :

म्हाडा लॉटरी 2026 अंतर्गत मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा या भागांचा समावेश आहे. (Mumbai MHADA Lottery 2026)

या घरांमध्ये म्हाडाच्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांतील 1762 घरे, पुनर्विकास प्रकल्पांतून विकासकांकडून मिळालेली घरे तसेच मागील सोडतींमधून रिक्त राहिलेली घरे अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या भागात घर खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

MHADA Lottery 2026 | कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे? :

या लॉटरीमध्ये विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) 145 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 858 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 1408 घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) 229 घरे उपलब्ध करण्यात आली आहेत.

लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्जदारांना 30 एप्रिलपर्यंत अनामत रक्कम जमा करण्याची संधी दिली जाणार आहे. तर या लॉटरीची अंतिम सोडत 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे.

News Title : MHADA Lottery 2026: 2640 Affordable Homes Announced in Mumbai; Check Locations and Important Dates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now