Mhada lottery 2024 | सर्वसामान्य नागरिकांचे मुंबई, पुण्यासारख्या शहरात स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून राज्यभरात जवळपास 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढली जाणार आहे. मुंबईसह कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील घरांसाठी ही लॉटरी (Mhada lottery 2024) काढली जाणार आहे.
म्हाडातर्फे याच महिन्यात सोडतीची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुंबई आणि पुणे येथे घरे घेण्यासाठी खूप पैसे भरावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक इथे घर घ्यायला चार वेळा विचार करतात. त्यामुळे राज्यात म्हाडातर्फे नागरिकांना स्वस्त आणि माफक दरात घरे दिली जातात.
म्हाडाच्या 7500 घरांसाठी याच महिन्यात सोडत
म्हाडाच्या या घरांना मोठी मागणी असते. दरवर्षी या लॉटरीसाठी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक अर्ज करत असतात. दरम्यान, म्हाडाच्या प्रत्येक मंडळाची वर्षातून किमान एक तरी लॉटरी काढण्यात येईल अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
सदरील लॉटरी ही मुंबईतील 1900 हजार घरांसाठी (Mhada lottery 2024) काढली जाणार आहे. यासाठीची जाहिरात ही 22 जुलैपर्यंत काढली जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी महिनाभर मुदत दिली जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सोडत काढली जाईल.
‘या’ शहरात घरांची सोडत काढण्यात येणार
मुंबई सोबतच पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर येथील 5 हजार 600 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे 1500, मुंबई 1900, कोकण 1600, पुण्यात 2500 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी तब्बल पाच हजार घरांची सोडत काढण्यात(Mhada lottery 2024) आली होती. यात पुण्यातील आणि मुंबईतील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांनी या सोडतीसाठी अर्ज केले होते. या सोडतीची लॉटरी गेल्या वर्षी जाहिर झाली होती. आता यावर्षी पुन्हा सामान्य नागरिकांना संधी असणार आहे.
News Title – Mhada lottery 2024
महत्त्वाच्या बातम्या-
वर्षांनंतर सलमान-ऐश्वर्या आले पुन्हा एकत्र?, ‘त्या’ फोटोने चर्चेला उधाण
“महाराष्ट्रात जातीयवाद सुरूये, माझ्या मतदारसंघात 40 टक्के दलित व मुस्लिम तरी मी निवडून येतो”
“…तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडू यांची मोठी घोषणा
मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
“माझ्यावर गुन्हा झाला तरी..”, विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक






