पुरुषांनो, गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा होईल गंभीर परिणाम

On: October 17, 2025 4:59 PM
Bathing in hot water
---Advertisement---

Bathing in hot water | दिवसभराच्या थकव्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यावर मिळणारा आराम अनेकांना हवासा वाटतो. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि मनही शांत होते. मात्र, ही सवय पुरुषांसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नव्या अभ्यासानुसार, रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि हृदयाच्या आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (Men Bathing in hot water)

शुक्राणूंच्या आरोग्यावर थेट परिणाम :

दिल्लीतील आयव्हीएफ अटलांटिस हेल्थकेअरचे संचालक आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. मनन गुप्ता यांच्या मते, गरम पाणी शरीराला आराम देत असले तरी, त्याचा नियमित वापर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. शुक्राणूंच्या (Sperm) निरोगी निर्मितीसाठी वृषणांचे (Testicles) तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा थोडे कमी असणे आवश्यक असते.

मात्र, गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे हा नैसर्गिक समतोल बिघडतो. वृषणांचे तापमान वाढल्याने शुक्राणूंची गुणवत्ता (Quality), संख्या (Quantity) आणि गतिशीलता (Motility) यावर थेट परिणाम होतो, ज्यामुळे दीर्घकाळात वंध्यत्व किंवा नपुंसकत्व येण्याचा धोका वाढतो.

Bathing in hot water | आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र एकाच मताचे :

केवळ आधुनिक वैद्यकशास्त्रच नाही, तर आयुर्वेदामध्येही पुरुषांना त्यांच्या गुप्तांगांवर गरम पाण्याचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे अतिउष्णतेमुळे (Overheating) शुक्राणूंच्या निर्मिती प्रक्रियेत अडथळा येतो. यावर एक सोपा उपाय सांगितला जातो – जर तुम्ही रोज गरम पाण्याने अंघोळ करत असाल, तर अंघोळीच्या शेवटी प्रायव्हेट भाग थंड किंवा कोमट पाण्याने धुवावेत. यामुळे शुक्राणू पेशींचे संभाव्य नुकसान टाळता येते. (Men Bathing in hot water)

गरम पाण्याने अंघोळ करण्याचा परिणाम केवळ प्रजनन क्षमतेवरच नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. तापमानातील अचानक बदलामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके (Heart Rate) वाढू शकतात. ज्या पुरुषांना आधीपासूनच हृदयविकार, मधुमेह किंवा स्थूलतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर असू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमितपणे आपल्या हृदयाचे आरोग्य तपासावे.

याचा अर्थ असा नाही की गरम पाण्याने अंघोळ पूर्णपणे बंद करावी, पण त्याचा अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. गरम पाण्याने अंघोळ करण्याची वेळ, तापमान आणि वारंवारता यांचा योग्य समतोल साधल्यास संभाव्य धोके टाळता येतात. निरोगी प्रजनन क्षमता आणि एकूण आरोग्य टिकवण्यासाठी ही लहानशी सवय मोठा फरक घडवू शकते.

News title : Men, be careful when bathing in hot water, otherwise there will be serious consequences.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now