‘आर. आर. पाटील यांनी…’; मीरा बोरवणकरांचा नवा खुलासा

On: October 16, 2023 6:09 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकातून अजमल कसाबबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कधीच बिर्याणी खाल्ली नाही असा मोठा खुलासा माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी केलाय. तसेच त्याच्या फाशीबद्दल देखील त्यांनी पुस्तकात भाष्य केलंय.

एकदा तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी मला पुण्यातील सर्किट हाऊसला बोलावून घेतलं आणि फाशीबाबतची सगळी प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी पाटील यांनी जगातील काही देश कसाबच्या फाशीबाबत हस्तक्षेप करू शकतात अशी माहिती दिली. त्यानंतर मी दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून पूर्ण प्लॅन तयार केला ज्यामध्ये योगेश देसाई आणि सुनील धमाल हे अधिकारी होते असं मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

याआधी राज्यात तीस वर्षांपूर्वी फाशी झाली होती. अनेक तुरुंग धूळ खात होते, त्यामुळे कसाबला फाशी देताना अनेक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं होतं, असं त्यांनी पुस्तकात म्हटलंय.

दरम्यान, फाशीच्या आदल्या दिवशी 20 तारखेला मी येरवडा तुरुंगात जाऊन आले. सर्व प्रोटोकॉल आणि सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवली. मी ब्लेझर घातला. युनिफॉर्म न घालता जाऊन सगळ्या सुरक्षेची पाहणी केली आणि आढावा घेतला होता असं बोरवणकर म्हणाल्या

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now