सरोगेट मातांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!

On: June 24, 2024 7:10 PM
Maternity Leave for Surrogate Mother
---Advertisement---

Maternity Leave | देशात गरोदर महिलांना प्रसूती रजा दिली जाते. मात्र, यामध्ये सरोगसीद्वारे आई बनणाऱ्या महिलांसाठी कोणताही नियम नव्हता. मात्र, आता केंद्र सरकारने शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिला सरोगसीद्वारे आई बनणार आहेत, त्यांच्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारी महिला कर्मचारी सरोगसीद्वारे माता झाल्या तरी त्यांना प्रसूती रजा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने 50 वर्षे जुना नियम बदलून 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे.

मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

यासोबतच वडिलांना देखील 15 दिवसांची पितृत्व रजा घेता येणार आहे. केंद्रीय नागरी सेवा मधील सुधारित नियमांची अधिसूचना जारी करताना कार्मिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, सरोगेट माता तसेच दोनपेक्षा कमी मुले हयात असलेल्या माता यांना 180 दिवसांची मातृत्व रजा मंजूर केली जाणार आहे. 

“सरोगेट माता”लाही मिळणार प्रसूती रजा

आतापर्यंत सरोगसीद्वारे मूल जन्माला आल्यास सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा कोणताही नियम नव्हता. नवीन नियमांनुसार, सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत, कमिशनिंग वडिलांना डिलिव्हरीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळेल. इतके (Maternity Leave) दिवस फक्त महिलांना प्रसूती रजा दिली जात होती. आता पुरुषांनाही 15 दिवसांची पितृत्व रजा दिली जाणार आहे.

केंद्रीय नागरी सेवा नियम 2024 नुसार, सरोगसीच्या बाबतीत, दोनपेक्षा कमी हयात असलेल्या बालकांच्या कमिशनिंग आईला बाल देखभाल रजा मंजूर केली जाणार आहे. कार्मिक मंत्रालयाने सुधारित नियमांमध्ये स्पष्ट केले आहे की “सरोगेट मदर” म्हणजेच कमिशनिंग आईच्या वतीने मुलाला जन्म देणारी महिला होय.

News Title – Maternity Leave for Surrogate Mother

महत्त्वाच्या बातम्या

पिपाणी चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

“या बांडगुळांनी लोकसभेत हिंदुत्व हिंदुत्व, मुसलमान मुसलमान करत…”

“कितीही टणाटणा उड्या मारूद्यात..”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पंकजा मुंडेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; ओबीसींकडून जिंतूर बंदची हाक

मोदी सरकार शेतकऱ्यांना करणार खुश?; अर्थसंकल्पात ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

Join WhatsApp Group

Join Now