पलाश मुच्छल प्रकरणात नवा ट्विस्ट; मेरी डिकॉस्टाच्या नावाने पोस्ट व्हायरल

On: November 26, 2025 5:14 PM
Mary D’Costa viral post
---Advertisement---

Palash Muchhal | भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana wedding) आणि म्युझिक कम्पोझर पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता नवा वळण आला आहे. लग्न एक दिवस अगोदर अचानक पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अटकळांना उधाण आले. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचे कारण देण्यात आले, परंतु त्यानंतर व्हायरल झालेल्या काही चॅट्समुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.

दरम्यान, आता मेरी डिकॉस्टा (Mary D’Costa viral post) नावाच्या तरुणीच्या नावाने एका पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पलाशसोबतचे फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाल्यानंतर मेरीनेच ते चॅट्स शेअर केल्याचे समोर आले. आता तिच्या नावाचा नवा पोस्ट समोर येत असून त्यात अनेक महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत.

मेरीचा दावा: ‘मी कधीच पलाशला भेटले नाही’ :

मेरीच्या (Mary D’Costa viral post) नावाने व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये ती म्हणते की, तिने पोस्ट केलेले चॅट्स मे ते जुलै 2025 दरम्यानचे आहेत आणि हे चॅट फक्त एका महिन्यापुरतेच सुरू होते. ती पुढे म्हणते की, “मी पलाशला कधीच भेटले नाही. मला माझी ओळख उघड करायची नव्हती, पण मला त्याचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता.”

मेरी पुढे सांगते की, ती क्रिकेटची चाहती असून ती स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana wedding) खूप आदर करते, त्यामुळेच तिला सत्य लोकांसमोर आणण्याची इच्छा झाली. “लोक मला कोरिओग्राफर समजत आहेत, पण मी तशी नाही. पलाशनं जिच्यासोबत स्मृतीची फसवणूक केलीय ती व्यक्ती मी नाही,” असा दावा तिने केला आहे. तिने सांगितले की, या सर्व प्रकरणामुळे तिला स्वतःचे अकाऊंट प्रायव्हेट करावे लागले.

Palash Muchhal | व्हायरल चॅट्समुळे वाढल्या चर्चा :

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट्समध्ये पलाशने मेरीला एकत्र पोहायला जाण्याचे सुचवल्याचे दिसते. त्यावेळी मेरीने “तू रिलेशनमध्ये आहेस ना?” असा सरळ प्रश्न विचारला, पण पलाशने तो मुद्दा चुकवत गप्पा पुढे नेल्याचे दिसते. या चॅटमुळे पलाश स्मृतीची फसवणूक करत असल्याची चर्चा अधिक वेगाने पसरली.

लग्न पुढे ढकलल्याची घोषणा केल्यानंतर स्मृतीने प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केल्याने या चर्चांना अधिक उधाण आले. नेटकरीही पलाशवर टीका करत आहेत. मात्र स्मृती किंवा पलाश या दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

News Title: Mary D’Costa Viral Post on Smriti Mandhana–Palash Muchhal Wedding Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now