‘होम मिनिस्टर’ पोहचले राणादा आणि पाठकबाईंच्या घरी

On: January 14, 2023 3:08 PM
---Advertisement---

मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जिव रंगला’ या मधील सुप्रसिद्ध जोडी राणा आणि पाठकबाई हे मागच्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत. राणा आणि पाठकबाई ही भूमिका साकारणारे अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दीक जोशी (Hardik Joshi) यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

छोट्या पडद्यावरील त्यांच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांनाच वेड लावलं. हे दोघे त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवर कायम सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत असतात.

या वेळेस सुद्धा अक्षायनं तिच्या चाहत्यांसाठी पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतरची अक्षया आणि हार्दीकची ही पहीली संक्रात असून ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पड्यावर दिसली आहे.

‘होम मिनीस्टर’ या टिव्ही शोच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संक्रांत स्पेशल म्हणून या दोघांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अक्षयाने काळ्या रंगाची साडी नेसली असून एकदम मराठमोळा लूक केला आहे. त्यासोबतच हार्दीकने सुद्धा काळ्या रंगाचा कुर्ता परीधान केला आहे.

दोघांच्या या लूकवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. अनेक चाहत्यांनी या दोघांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’; चित्रा वाघ पुन्हा भडकल्या

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आलिया-रणबीरच्या लेकीचे फोटो आले समोर!

आपला कुठलाही देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही- चंद्रकांत पाटील

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now