Maratha Reservation l गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे. याच आरक्षणाच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं आहे. मात्र नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट तोफ डागली होती. मात्र आता आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा :
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी करत आमदार राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच राज्यातील जास्तीत जास्त मराठा आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्यासाठी मागणी केल्यास अध्यक्षांना अधिवेशन घ्यावेच लागेल. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी व सर्व आमदारांकडे जाऊन अध्यक्षांना पत्र देण्याची विनंती करण्याचं आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे.
याशिवाय, जर सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला, तर राज्यातील 5 कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच पूर्णपणे बहिष्कार घालावा असे आवाहन देखील आमदार राऊत यांनी ठिय्या आंदोलनादरम्यान जनतेला केलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांनी हे ठिय्या आंदोलन केल्याने राज्यात एकप्रकारे चर्चेचा विषयच बनला आहे.
Maratha Reservation l दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल :
यासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत बोलताना म्हणाले की, मी बार्शीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक हे महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो, मात्र आता सत्ता आल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारसोबत असलो तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलं आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, त्यांच्या विरोधात राज्यातील सर्व मराठा समाजाने मतदान करावे असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे. तसेच अगदी त्यानंतरच प्रत्येक पक्षाची अंधारातील भूमिका व खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल, असे देखील आमदार राऊत म्हणाले आहेत.
News Title – Maratha Reservation Rajendra Raut News
महत्त्वाच्या बातम्या-
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार?
मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती
झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?






