मराठ्यांनी बीड पेटवलं!, शरद पवारांच्या खास आमदाराच्या घराला लावली आग

On: October 30, 2023 7:41 PM
---Advertisement---

बीड | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी आज काही हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शांततेच्या मार्गानं चाललेलं मराठा आंदोलन आता हिंस वळणावर येऊन ठेपलं आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या खास आमदाराच्या घराला आग लावण्यात आली आहे.

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. याआधी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्याची तसेच माजलगाव नगरपरिषदेलाही आग लावल्याची घटना घडली होती. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयावरही मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. गनिमी काव्याचा वापर करत त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी तेथील काही लोकांशी त्यांचं बोलणं झाल्याची देखील माहिती आहे. त्यानंतर आंदोलकांनी थेट बंगल्याला आग लावली. पाहता पाहता बंगल्यातून आगीचे मोठमोठे लोट निघल्याचे पहायला मिळालं.

दरम्यान, मराठा आंदोलनानं हिंसक वळण घेतल्याने मनोज जरांगे पाटील व्यथित झाले आहेत. जाळपोळीच्या घटना ताबडतोब बंद कराव्यात अन्यथा मी वेगळा निर्णय घेईल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आंदोलक हिंसाचार थांबवतात की हा हिंसाचार आणखी मोठं रुप घेतो, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now