Maratha Reservation | आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या मराठा तरूणाचे नाव आहे. प्रसाद देठे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी फेसबुक लाईव्ह आणि सुसाईड नोट लिहली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी भापजच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, (Pankaja Munde) ओबीसी नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे यासह इतर नेत्यांची नावे लिहली आहेत.
आत्महत्येपुर्वी प्रसाद देठे यांनी एक चिठ्ठी लिहली आहे आणि फेसबूक लाईव्ह देखील केले आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुद्दा पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना देखील सवाल केला आहे.
“उद्या मी मेलो, तर पंकजाताई माझ्या घरी येतील का?”
लक्ष्मण हाकेंकडे पंकजाताई गेल्या, पण चारवेळा उपोषणाला बसून पंकजा ताई अंतरवाली सराटीत गेल्या नाहीत. कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्यानंतर ताई त्यांच्या घरी गेल्या. ठिक आहे सांत्वन करण्यासाठी गेल्या पाहिजेत. उद्या मी मेलो, तर पंकजाताई माझ्या घरी येतील का? मलाही तीन लेकरं आहेत, असा सवाल त्यांनी केलाय.
ताई, बबनराव तायवाडे, लक्ष्मण हाके, प्रकाश अण्णा शेंडगे असतील यांना आपल्या समाजाचे जे प्रश्न दिसतात ते त्यांनी इतर समाजाचे ते बघावेत, असंही प्रसाद देठे म्हणाले.
Maratha Reservation | “24 तास काम करून लेकरांचं भागत नाही”
प्रसाद देठेंच सगळं चांगलं दिसतं, पण नीट बघितलं, तर ती माझी कंपनी आहे. नाईटला काम करतो, दिवसा आणि कुठं तरी काम करावं लागत आहे. तेव्हा थोडं फार लेकरांचं होतंय, 24 तास काम करून लेकरांचं भागत नाही. ही फक्त माझीच स्थिती नाही, अनेकांची हीच व्यथा आहे. माझ्या कंपनीत एका जातीचे नाहीत, अठरापगड जातीच आहेत. गावगाड्यावर मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये काहीच कटूता नाही, असंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.
सुसाईट नोट-

महत्त्वाच्या बातम्या-
’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
“…राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
सोनाक्षी सिन्हा मुस्लिम अभिनेत्यासोबत करणार लग्न, भाऊ म्हणाला…






