Manoj Jarange | ‘धोका झाला तर…’; मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

On: January 27, 2024 11:16 AM
Manoj Jarange
---Advertisement---

मुंबई |  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार हा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी शब्द दिलेला, तो त्यांनी पूर्ण करुन दाखवला. सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचा विजय झाल्यानंतर नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भव्य सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केला. तसेच सरकारला गंभीर इशारा देखील दिला आहे.

Manoj Jarange | “अध्यादेशाला काही धोका झाला, तर…”

अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो म्हणून समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर सोडवायला मी पुढे असणार, असं जरांगेंनी म्हटलं आहे. अध्यादेश टिकवून ठेवण्याची, लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा गुलाल अध्यादेशचा आहे, त्याचा सन्मान राहू दे. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे, असं त्यांनी म्हटलंय.

आरक्षणाल मारलेले खुट्टे उपटून फेकणार म्हणजे फेकणार बोललेलो. मराठ्यांच्या नादी लागायच नाही. तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही गावखेड्यात मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होऊ दिला नाही. छोटा-मोठा भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो. नेते आमच्यात भांडण लावतात, असं जरांगे म्हणालेत.

सोबतच कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्थरावर समिती नेमण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासले जाणार आहे. ओबीसी बाबत असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा मुलांना मिळणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी , मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Marath Reservation | मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून उपोषण सोडलं

Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान

Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?

Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..

Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now