“उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…”; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

On: June 13, 2024 12:36 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.आज (12 जून) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 8 जूनरोजी जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. या दरम्यान त्यांची तब्येत देखील खालावली होती.

जरांगे यांची आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी भेट घेतली आहे.सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे उपोषणाला बसले आहेत. सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहे.

मनोज जरांगे यांची सरकारला डेडलाईन

आज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे.”मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या 5 वाजता मी माझा निर्णय घेईल.”, असं जरांगे म्हणाले आहेत.

“मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येत आहेत. मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही?”, असा सवाल यावेळी जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपस्थित केला.

“तुम्ही खेळवत राहिले तर मी आणि माझा समाज..”

“सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी. अंमलबजावणी करण्यासाठी काय 12-12 महिने लागतात काय?त्यांच्याकडून चर्चेसाठी कोण येणार माहीत नाही. ते काल येणार होते पण आले नाहीत.”,असंही यावेळी जरांगे यांनी सांगितलं.

कालही माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता. “तुम्ही असंच खेळवत राहिले तर कदाचित हे माझं शेवटचं उपोषण असेल. असं सारखं सारखं उपोषण करायाला मला तरी कुठं वेळ आहे. तुम्ही खेळवत राहिले तर मी आणि माझा समाज डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल.”, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले होते. आज तर त्यांनी सरकारला डेडलाईनच दिली आहे.

News Title-  Manoj Jarange ultimatum to the government

महत्त्वाच्या बातम्या-

‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?

पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

मला तिकिट मिळू नये, त्यासाठी पक्षातील लोकांनी सुपारी दिली; या खासदाराचा धक्कादायक आरोप

Join WhatsApp Group

Join Now