Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरूवात :
मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ते 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे. तसेच या दरम्यान, हिंगोलीमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागताची देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगेंच्या या शांतता रॅलीला आज सुरूवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहेत. जरांगे पाटील हे शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहेत. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार असल्याचे समोर आले आहे.
Manoj Jarange l कसा असणार मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग? :
आजपासून मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रॅलीला सुरवात आज हिंगोलीपासून सुरु होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे? हे मात्र 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – पुढे पोस्ट ऑफिस रोड – त्यानंतर आखरे मेडिकल – नंतर खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक – पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार) – यानंतर महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करणार) – पुढे इंदिरा गांधी चौक इंदिरा गांधी चौकामध्ये जरांगे यांचं समारोपीय भाषण होणार आहे.
News Title – Manoj Jarange Shantata Rally
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं
ब्रेकिंग! खासदार रविंद्र वायकरांना क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
T20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार, जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती
या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता
परीक्षा न देता थेट बँकेत मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी अर्ज झाले सुरू






