Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) महायुतीला पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. तसा इशाराच जरांगेंनी महायुतीला दिला आहे.
मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेण्याचं आश्वासन दिल्यानेच आपण सलाईन लावली. आज संध्याकाळपर्यंत याबाबत काय ते कळेल. नाहीच काही झालं तर सलाईन फेकून देऊ, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही दहापट फटका बसेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी महायुतीला दिला आहे.
जरांगे महायुतीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत
जोपर्यंत काम होत नाही, विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास नाही. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवत आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी पाच महिन्यापासून झालेली नाही. एवढा वेळ थोडाच लागतो. आम्ही सलाईन कुणाच्या शब्दाला मान ठेवून लावली ते जाहीरपणे सांगू. निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू तर करा. नाही केली तर आम्ही नाव घेऊन सांगू, असं जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले.
आरक्षणाबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल. नाही कळालं तर सलाईन काढून फेकू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असं एका मंत्र्याने रात्री सांगितलं. त्यांच्या शब्दाला मान दिला. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवूच नये का? शेवटी निर्णय घेणारे तेच आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले.
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती आता खालावत आहे.
गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस?; ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा
‘ते’ अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत काय?; बजरंग सोनवणेंनी सुनावलं
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगेंच नाव देण्यात येणार






