मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा, थेट म्हणाले..

On: May 17, 2024 11:13 AM
Manoj Jarange Patil warning to Pankaja and Dhananjay Munde
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर इशारा दिला आहे. जरांगे पाटील सध्या बीडमध्ये असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

उपोषणाबाबतही जरांगे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली. त्यांनी नारायण गडावरील सभा पुढे ढकलत आता मी लगेच उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच उपोषणबाबत 4 जूनपूर्वीच ठरवू, असं त्यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ‘तुला जीवे मारू’, अशा धमक्या मलाही येत आहेत. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असंही म्हटलं जात आहे, असा आरोप करत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मुंडे बंधू-भगिनीला इशारा दिला.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

“मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावं की मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही, तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी आहे.”, असं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) म्हणाले आहेत.

8 जूनला बीडच्या नारायणगडमध्ये होणारी सभा पुढे ढकलली असून त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. मात्र, आता सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावं लागेल. 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

News Title –  Manoj Jarange Patil warning to Pankaja and Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?”; बड्या नेत्याने थेट फार्म्युलाच सांगितला

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”

बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!

“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”

होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!

Join WhatsApp Group

Join Now