“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी आता मराठा संघटनांची केली आहे. मनोज जरांगे यांच्या गावात म्हणजेच अंतरवाली सराटी येथे ड्रोन फिरत असल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना धोका असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान काही दिवसांआधी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर आता मराठा संघटनांनी देखील झेड प्लस सुरक्षेची मागणी केली आहे.

ड्रोनद्वारे टेहाळणीचे प्रकार कोण करतंय?

अंतरवाली सराटी या गावात ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. ड्रोनद्वारे टेहाळणीचे प्रकार कोण करत आहेत. कशामुळे ही टेहाळणी केली जात आहे?, असे प्रश्न करण्यात येत आहेत.

या प्रकारामुळे अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याच्या प्रतिक्रिया मराठा मोर्चा संघटनांनी दिली. तसेच ड्रोनद्वारे टेहाळणीचे प्रकार कोण करत आहे, कशामुळे ही टेहाळणी केली जात आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहे. यामुळे आता अंतरवाली सराटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुऱक्षा द्या अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. मराठा संघटना आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनात अनेक पदाधिकारी देखील होते. यावेळी आंदोनकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

हिंगोली येथे मनोज जरांगे पाटील यांनी 6 जुलै रोजी जनजागृती शांतता रॅली होणार आहे. या रॅलीची तयारी सुरू झाली आहे. मार्गावर भोंगे लावण्यास सुरुवात झालेली दिसते.  याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. लाखो मराठा बांधव या रॅलीत सहभागी होणार आहेत.

इतर गावांमध्येही ड्रोनद्वारे चोरट्यांची नजर

त्यासाठी हिंगोली परिसरात प्रचार केला जात आहे. तसेच अंतरवाली सराटीप्रमाणेच राज्यातील काही ग्रामीण भागातही ड्रोन फिरत आहेत. अशा ठिकाणी चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. गावांमध्ये ड्रोन फिरत असल्याने रात्री चोऱ्या होताना दिसत आहेत. हाच प्रकार मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत होताना दिसत आहे.

News Title – Manoj Jarange Patil Supporter Want To Z Plus Security

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; शिक्षण फक्त दहावी

गणेशोत्सवाला एसटीने कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल!

जुलै महिन्यात लाँच होणार ‘या’ भन्नाट कार; पाहा यादी

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी