राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न…; मनोज जरांगे पाटलांनी केला घणाघाती आरोप; नेमकं प्रकरण काय?

On: February 21, 2026 5:29 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार (Lonar) तालुक्यातील चिखला (Chikhala) गावात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून मोठा संघर्ष उफाळून आला. सार्वजनिक ठिकाणाहून पुतळा हटवण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गंभीर आरोप आणि ठोस मागण्या केल्या आहेत.

पोलिसांवर गंभीर आरोप आणि कारवाईची मागणी :

चिखला गावात (Chikhala village) पुतळा हटवण्याच्या प्रयत्नावरून झालेल्या वादात दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या गोंधळात एका महिलेला मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला. त्यानंतर 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil)

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करून तो हटवण्याचा कट रचला गेला, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा दावा करत त्यांनी या प्रकारामागे कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतू असल्याचे म्हटले. राज्यात शांतता नको, अशी काहींची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Manoj Jarange Patil | जातीय तणावाचा मुद्दा आणि आंदोलनाचा इशारा :

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुढे बोलताना हा प्रकार जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप केला. संबंधितांवर कठोर कलमे लावून तातडीने अटक करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा राज्यस्तरीय बैठक चिखला गावात घेण्याचा इशारा त्यांनी दिला. या घटनेचे परळीशी (Parli) काही संबंध असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

तसेच 25 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी पुतळा कोणत्याही परिस्थितीत हलवला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. सरपंचावरही गुन्हा दाखल करून कलम 307 सह इतर गंभीर कलमे लावावीत, अशी मागणी त्यांनी केली. पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचीही मागणी करत, योग्य कारवाई न झाल्यास गावात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

News Title: Manoj Jarange Patil Slams Buldhana Clash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now