‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?

On: June 18, 2024 8:41 PM
Manoj Jarange Patil Sangharsha Yodha
---Advertisement---

Manoj Jarange Patil Sangharsha Yodha | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या सिनेमाची देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेलं आंदोलन, उपोषण तसेच मराठा समाजासाठी दिलेला लढा सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. अशातच आता या सिनेमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि वकील गुणरत्न सदावर्तेंच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. (Manoj Jarange Patil Sangharsha Yodha)

वकील गुणरत्न सदावर्तें आणि छगन भुजबळ यांची भूमिका कोणी साकारली?

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Sangharsha Yodha) हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण राजभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका ही अभिनेते संजय कुलकर्णी साकारणार आहेत. तर वकील गुणरत्न सदावर्तेंची भूमिका ही अभिनेता आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी भूमिका साकारली आहे. (Manoj Jarange Patil Sangharsha Yodha)

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटाचा ट्रेलर हा सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनी कमालिची उत्सुकता लागली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तसेच त्यासोबत अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विनीत भोंडे, विजय मिश्रा, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, किशोर चौघुले, समोनाथ अवघडे, उर्मिला डांगे आणि सिद्धेश्वर झाडबुके हे या सिनेमात दिसणार आहेत.

शिवजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते म्हणून रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. (Manoj Jarange Patil Sangharsha Yodha)

दरम्यान, सगेसोयरे अंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन, उपोषण करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली होती. मात्र त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली असल्याची माहिती समोर आली.

News Title – Manoj Jarange Patil Sangharsha Yodha Movie In Adv. Gunratna Sadavarte Role And Chhagan Bhujbal Role

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही

सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…

मोठी बातमी! एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं

ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम

Join WhatsApp Group

Join Now