Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी करत आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी समाज हा मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण देण्याबाबत सरकारकडे मागणी करत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नये, अशी ओबीसी बांधवांची मागणी आहे. अशातच आता मनोज जरांगेंनी मोठी कंबर कसली आहे.
मनोज जरांगेंचं रॅलीसाठी आवाहन
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण जरी थांबवलं असलं तरीही आंदोलन सुरूच आहे. अशातच आता त्यांनी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मराठा बांधवांनी रॅलीमध्ये आपली उपस्थिती दाखवावी, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी जनजागरण रॅली आयोजित केली आहे. 6 जुलै ते 13 जुलै पर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. त्या रॅलीला सर्व कामे आटपून घ्या. शांततेत या. त्या दिवशी एकानेही घरात थांबू नका. लग्न कार्यालाही जाऊ नका. ताकदीने रस्त्यावर या. आपल्याला घेरलंय. मी एकटा पडलोय. मी हटणार नाही. मेलो तरी मी मागे हटणार नाही. आपल्या रॅलीला आया बहिणींनी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा नेत्यांना सांगतो. सर्व पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये म्हणून एकवटले आहेत. ते मतांचा विचार करत नाहीत. ते आरक्षणाचा विचार करत आहेत. मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा विचार करत नाहीत. ओबीसी नेत्यांना मतांची गरज नाही. त्यांना आरक्षण हवं आहे. त्यावरून आरक्षणचा मुद्दा किती मोठा आहे हे लक्षात येतं, असंही ते म्हणालेत.
सर्वच ओबीसी नेते एकत्र आले आहेत. विरोधी पक्षातील ओबीसी नेते एकत्र आले आहेत. कोणीही पक्षाला जुमानत नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. सर्व ओबीसी नेते एकवटले आहेत. म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांना समजतं नाही का? ते मताला आणि पदाला किंमत देत नाहीत. तुम्ही का करत नाही? तुम्हाला कळत नाही का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“मी एकटा पडलो”
मी एकटा पडलो आहे. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून मला घेरलं गेलं आहे. आपण एकजूट राहा. मराठा नेत्यांना आवाहन करतोय की, जातीचं राजकारण मोठं आहे. तुम्ही पद आणि मतांकडे पाहू नका अशी हात जोडून विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली.
News Title – Manoj Jarange Patil Big Announcement About Maratha Reservation News Update
महत्त्वाच्या बातम्या
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!
पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
पार्किंगमध्ये कार जास्त वेळ पार्क करताय? तर होऊ शकतं मोठं नुकसान






