“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; जरांगे पाटलांचा इशारा

On: January 11, 2025 6:16 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange l सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले? :

मनोज जरांगे पाटील जाहीर भाषणात म्हणाले की, जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर तुमचा सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. तसेच मी मंत्री धनंजय मुंडे यांना सांगतो की, तुमची टोळी थांबवा. तसेच ही धमकी नाही तर मी तुम्हाला सावध करत आहे. यापुढे तुमच्या गुंडांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. याशिवाय तुमचे पाप झाकण्यासाठी पांघरुन घेऊ नका, असे मनोज जरांगे पाटील धाराशिवमध्ये म्हणाले आहेत”.

दरम्यान, “मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. तसेच मी 25 तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. मात्र त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाहतो, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत”.

Manoj Jarange l आरोपींवरील मोक्का आम्हाला अमान्य :

अशातच आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.

अशातच आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला (वाल्मिक कराड) मोक्का लागला नाही तर आम्हाला हा मोक्का देखील मान्य नाही. तसेच खंडणीतील आरोपीवर देखील मोक्का लागला पाहिजे. कारण हा सर्व प्रकार खंडणीमुळेच घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे देखील खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे, असं जरांगे म्हणाले आहेत.

News Title :  Manoj Jarange criticizes to MLA Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुखांची हत्या ‘इतक्या’ कोटींसाठी केली, सुरेश धसांचा हल्लाबोल

“…तरच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरील मोक्का टिकेल”, वकील नेमकं काय म्हणाले?

केस कापायला आता मोजावे लागणार इतके पैसे, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका!

बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

बीडमध्ये एका महिन्यात घडल्या मोठ्या घडामोडी? जाणून घ्या संपूर्ण घटना एका क्लिकवर

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now