Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जरांगेंचे आरोप काय?
धनंजय मुंडे यांच्यावर 302 (हत्या) अंतर्गत कारवाई होऊ नये यासाठी फडणवीसांनी पोलिसांना ‘फुल स्टॉप’ दिला आहे. मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर आरोपींची बैठक झाली, खंडणीसाठी आणि हत्येसाठी कट रचला गेला.
मुंडे हत्येच्या कटात सामील असल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. फडणवीस जाणीवपूर्वक गुंडांना वाचवत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
“धनंजय मुंडे हा विषारी साप” – मनोज जरांगे
इतकंच नाही तर, धनंजय मुंडे विषारी साप आहे. हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे. त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे, असंही जरांगे म्हणाले. फडणवीसांनी गुंड वाचवू नये. ही सरकारची बनवाबनवी सुरू आहे, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता फडणवीस आणि मुंडे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Title : Manoj Jarange Alleges Devendra Fadnavis Shielding Dhananjay Munde






