Devendra Fadnavis l राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र अशातच आता मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी राज्य सरकारला अल्टिमेटम दिल आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार :
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीआधी सरकारला शेवटची संधी देत असल्याचं सांगत अंतिम अल्टिमेटम दिला आहे. जर मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
आंदोलनकर्ते मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठीच हे 6 वं आमरण उपोषण सुरु झालं आहे. यावेळी पहिली जरांगे पाटलांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा. दुसरी म्हणजे मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरुन सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अंमलबजावणी करा आणि तिसरी मागणी म्हणजे हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा.
Devendra Fadnavis l राज्य सरकारला शेवटची संधी :
महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणुका अंदाजे सव्वा 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. विधानसभेची आचरसंहिता व निवडणुकीची घोषणा देखील पुढच्या 15 दिवसांत म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी जरांगेंनी देखील केली आहे. कारण महायुतीचे 113 आमदार पाडण्याचा इरादा मनोज जरांगे यांनी बोलूनही दाखवला आहे. मात्र आता त्याआधी आपण सरकारला शेवटची संधी देत असल्याचं जरांगें पाटलांचं म्हणणं आहे.
तर राज्यात दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणी देखील होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात धनगरांच्या आरक्षणाचा विषय मिटला नाही तर राज्यभर धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा देखील दिला आहे. या आंदोलनात होळकर घराणे तितक्याच ताकतीने सहभागी होणार आहेत. तसेच आगामी विधानसभेला धनगरांची ताकद या सरकारला दाखवणार असा इशारा देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला आहे.
News Title : Manoj jarange aginst on devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या-
आधारकार्ड वरील नाव बदलायचंय? तर लागतील ही कागदपत्रं
बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?
“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
आजचा दिवस संकटांचा, पदोपदी राहावं लागणार सावध;.. ही रास तुमची तर नाही?
पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश






