पुणे महापालिका महापौरपदी मंजूषा नागपुरेंची निवड!

On: February 3, 2026 1:37 PM
Manjusha Nagpure
---Advertisement---

Manjusha Nagpure | पुणे महानगरपालिकेत महिलांच्या नेतृत्वाची नवी सुरुवात झाली असून भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध होत असल्याने केवळ औपचारिक प्रक्रिया बाकी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला आहे.

बिनविरोध निवड आणि भाजपची सत्ता :

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या मंजूषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सिंहगड रोड परिसरातून प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला असून नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतही त्या प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल, असा निर्णय आधीच झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज भासलेली नाही.

पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील चर्चेनुसार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेतील सत्तेवर भाजपची एकहाती पकड अधिक मजबूत झाली आहे.

Manjusha Nagpure | उपमहापौरपदाची घोषणा आणि महिलांना मोठी संधी :

महापौरपदासोबतच उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी बैठकीत या दोन्ही नावांची अधिकृत माहिती दिली. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर कोणतेही फटाके फोडू नयेत, गुलाल उडवू नये किंवा बॅनर लावू नयेत, अशा सूचना भाजपकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी मार्गदर्शन केले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे एकूण 119 नगरसेवक निवडून आले असून पालिकेवर पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणावर महिलांना उमेदवारी दिली होती. एकूण 119 महिलांना संधी देण्यात आली असून त्यापैकी 50 हून अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे पुणे महानगरपालिकेत महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.

News Title: Manjusha Nagpure Becomes Pune Mayor

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now