युजवेंद्र-धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूचा संसार मोडणार?, चर्चेला उधाण

On: March 11, 2025 8:30 AM
Manish Pandey-Ashrita Shetty Divorce Rumors
---Advertisement---

Manish Pandey-Ashrita Shetty | भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे (Manish Pandey-Ashrita Shetty ) आणि त्याची पत्नी, तामिळ अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसलेले नाहीत, तसेच त्यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात मतभेद असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

सोशल मीडियावरील फोटो हटवल्याने चर्चांना उधाण

मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी यांनी डिसेंबर 2019 मध्ये लग्न केले होते. मात्र अलीकडे, या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे फोटो हटवल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा तसेच युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या वैवाहिक जीवनातील मतभेद चर्चेत आले होते. आता मनीष आणि अश्रिताच्या नातेसंबंधांबाबतही तशाच चर्चा रंगल्या आहेत.

मनीष पांडेची क्रिकेट कारकीर्द

मनीष पांडे भारतीय क्रिकेट संघातून गेल्या चार वर्षांपासून बाहेर आहे. त्याने भारतासाठी 29 एकदिवसीय आणि 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकलेला नाही.

2025 च्या आयपीएल हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाकडून खेळणार आहे. केकेआरने त्याला 75 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. (Manish Pandey-Ashrita Shetty )

दरम्यान, मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी यांनी अद्याप त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील त्यांनी एकमेकांचे फोटो हटवल्याने या चर्चेला अजूनच हवा मिळाली आहे.

Title : Manish Pandey-Ashrita Shetty Divorce Rumors

 

Join WhatsApp Group

Join Now