Astrology Prediction | ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक प्रभावशाली ग्रहयोग तयार होत आहे. 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे ‘मंगल-आदित्य राजयोग’ निर्माण होणार आहे. या ग्रहयोगाचा परिणाम काही राशींवर विशेषतः सकारात्मक पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रगती, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यशाचे संकेत दिले जात आहेत. (Mangal Aditya Rajyog)
सूर्य-मंगळ युतीचा प्रभाव :
पंचांगानुसार 2 एप्रिल रोजी दुपारी 03:37 वाजता मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत आधीपासूनच सूर्य ग्रह विराजमान असल्याने या दोन ग्रहांचा एकत्रित प्रभाव निर्माण होईल. सूर्य हा आत्मबल, नेतृत्व आणि अधिकाराचा प्रतिनिधी मानला जातो, तर मंगळ ऊर्जा, धैर्य आणि पराक्रमाशी संबंधित ग्रह आहे. या दोन्ही अग्नी तत्त्वाच्या ग्रहांची युती झाल्यावर ‘मंगल-आदित्य राजयोग’ तयार होतो.
ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत प्रभावी मानला जातो. या ग्रहयोगामुळे काही राशींना प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता असते. विशेषतः मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींना या काळात करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल आणि आत्मविश्वासातही वाढ होईल असे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात.
Astrology Prediction | मेष, सिंह आणि धनु राशींसाठी सुवर्णसंधी :
मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या राजयोगाचा परिणाम या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. सूर्याच्या सहवासामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात, तर सरकारी कामांमध्ये अडकलेली प्रकरणेही मार्गी लागण्याचे संकेत आहेत. विरोधकांवर मात करून यश मिळण्याची शक्यता या काळात वाढेल.
सिंह राशीचा स्वामी सूर्य असून मंगळ हा त्याचा मित्र ग्रह मानला जातो. त्यामुळे या योगामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. पदोन्नतीची वाट पाहणाऱ्यांना एप्रिलमध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. (Astrology Prediction)
दुसरीकडे धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा ठरू शकतो. त्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. राजकारण किंवा प्रशासकीय सेवेशी संबंधित लोकांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. याच काळात घर किंवा वाहन खरेदीसारखी महत्त्वाची स्वप्ने पूर्ण होण्याचेही संकेत आहेत.






