Malaika Arora l आयपीएल 2025 च्या रंगतदार सामन्यांबरोबरच मैदानाबाहेरही अनेक गोष्टींची जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीच्या एसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात क्रिकेटप्रेमींनी खेळाचा आनंद घेतला. मात्र या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्याकडे!
ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाने या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा टी-शर्ट परिधान केला होता. तिच्या या पोशाखाची निवड आणि संगकारासोबतची उपस्थिती यामुळे सोशल मीडियावर अफवांना उधाण आलं आहे. चाहते विचारू लागले – “मलायका आरआरला पाठिंबा देण्यासाठी आली होती की संगकारासाठी?”
मैदानावर क्रिकेट, मैदानाबाहेर चर्चेचा धुरळा :
सामन्यादरम्यान मलायका अरोरा आणि कुमार संगकारा एकत्र बसलेले दिसले. एकत्रित उपस्थिती आणि दोघांमधील संवादामुळे नेटिझन्समध्ये एकच खळबळ उडाली. “प्रेम लपवता येत नाही,” असं एका यूजरने म्हटलं, तर दुसऱ्याने विचारलं – “मलायकाचा आणि आरआरचा काय संबंध?”
सोशल मीडियावर अनेकांनी या दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आणि अनेकांना वाटू लागलं की या दोघांमध्ये काहीतरी खास सुरू आहे का? मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. संगकारा राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट संचालकपदी असून, मलायकाची उपस्थिती केवळ मैत्रीपूर्ण किंवा प्रचारासाठी होती का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
Malaika Arora l राजस्थान रॉयल्सचा शानदार विजय, पण चर्चेत ‘ही’ जोडी :
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत हंगामातील पहिला विजय नोंदवला. नितीश राणाच्या दमदार खेळीने संघाला बळ दिलं. मात्र चाहत्यांचे लक्ष खेळापेक्षा मैदानाबाहेरच्या ‘स्टार अटेंशन’कडे अधिक झुकले होते.
क्रिकेट आणि बॉलीवूड यांचं नातं नवीन नाही. पण मलायका आणि संगकाराच्या उपस्थितीने या नात्याला नव्याने एक चर्चा मिळाली आहे. प्रेमाची अफवा की फक्त एक फ्रेंडली इंटरॅक्शन – हे अजून स्पष्ट झालेलं नसून सोशल मीडियावर मात्र या चर्चांना ऊत मिळालाय.






