Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा सध्या परदेशात सुट्टी घालवत आहे. ती तिच्या व्हेकेशनमधील फोटो शेअर करत आहे. तर दुसरीकडे मलायका अरोराचा मुलगा अरहान खान सावत्र आई शूरा खानसोबत वेळ घालवताना दिसला. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरहान खान आणि शूरा खान यांच्यातील खास नातं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. अरहान खान आणि शूरा खान हे बोलत बोलत बाहेर येताना दिसत आहेत.
अरहान खानचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अरहान खान त्याची सावत्र आई शूरासोबत शॉपिंग केल्यानंतर एका कॉम्प्लेक्समधून बाहेर पडताना दिसत होता. खरेदी करून दोघेही आपापल्या गाडीत बसले.
अरहान खानचा दिसला सावत्र आईसोबत
या व्हिडीओवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने लिहिलं की, ‘ती उर्मिला मातोंडकरसारखी दिसते’. तर एकाने, ‘छान बाँडिंग आहे दोघांचं असं म्हटलंय. शुराचं कौतुक करताना आणखी एका चाहत्याने लिहिलं की, ती वयाने अरहानच्या बहिणीसारखी दिसते.
काही दिवसांपूर्वीच सावत्र आई शूरा खान, वडील अरबाज खान यांच्यासोबत डिनरला अरहान पोहोचला होता. विशेष म्हणजे यावेळी अरहान हाच गाडी चालवताना दिसला. अरहान खान हा आई मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्यासोबतही चांगला वेळ घालवताना दिसतो.
दरम्यान, अरबाज खानने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केलं आणि दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर सहा वर्षांनी अरबाजने गेल्या वर्षी शुरा खानशी दुसरं लग्न केलं. शूरा अरबाज खानपेक्षा अनेक वर्षांनी लहान आहे. शूरा खान फक्त 31 वर्षांची आहे. ती अरबाजचा मुलगा अरहानपेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठी आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन
गोरंपान दिसणं झालं सोपं, ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय आत्ताच ट्राय करा!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा
उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!






