वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर

On: September 11, 2024 5:29 PM
Malaika Aroara
---Advertisement---

Malaika Aroara | अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचं पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून अनिल यांनी आयुष्य संपवलं. आलमेडा पार्क या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.

वडिलांच्या मृत्यूने मलायकावर आभाळ कोसळलं

वडिलांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मलायका (Malaika Aroara) मुंबईत नव्हती, ती पुण्यात होती. हे वृत्त ऐकताच ती तातडीने मुंबईच्या दिशेने निघाली. थोड्या वेळापूर्वीच ती तिच्या घरी पोहोचली.

मलायकाने गाडीतून उतरून थेट आतमध्ये धाव घेतली. तिच्या मागोमाग तिची छोटी बहीण अमृता अरोरा हीदेखील तिच्या पतीसोबत पोहोचली होती.

मलायका आरोरा (Malaika Aroara) आणि पापाराझींचं खूप छान बॉन्डिंग आहे. पापाराझींसमोर नेहमीच हसत खेळत येणारी मलायका आज पूर्णपणे डिप्रेस दिसली. तिनं पापाराझींसमोर दु:ख लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शेवटी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच. मलायकाचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.

Malaika Aroara च्या अश्रूंचा बांध फुटला

मलायकाने चेहऱ्यावर मास्क लावला होता. मलायकानं स्वत:ला खूप कंट्रोल केलं पण इमारतीच्या गेटच्या आत शिरताच मलायकाच्या अश्रूंचा बांध फुटला.

मलायका अरोरा हिचा पूर्व मती अरबाज खान हादेखील या कठीण काळात त्यांना साथ देण्यासाठी घरी पोहोचला. इमारतीच्या बाहेर पोलिस आणि इतर लोकांशी संवाद साधतानाचा अरबाद याचा व्हिडीओ काही वेळापूर्वीच समोर आला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात टायफॉईडची साथ, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?

या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; नेमकं काय झालं होतं?

भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now