महाविकास आघाडीला झटका?; शुभांगी पाटील नॉट रिचेबल

On: January 16, 2023 2:04 PM
---Advertisement---

नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेसकडून (Congress) अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर मविआने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. 

आता मविआला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातली उमेदवार शुभांगी पाटील यांचा नंबर नॉट रिचेबल येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. ही घटना ताजी असतानाच दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही लागत नाहीये. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now