काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

On: March 26, 2026 12:29 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानाचा अंदाज अनिश्चित स्वरूपाचा दिसत आहे. काही भागांत तीव्र उष्णता जाणवत असताना तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Rain Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा :

गुरुवार 26 मार्च रोजी राज्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, तसेच घाटमाथ्याच्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय सातारा, सांगली (Sangli) या जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. (Maharashtra Weather Update)

मराठवाड्यातील सोलापूर (Solapur), परभणी, बीड (Beed), नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Weather Update | मुंबईत उकाडा, विदर्भात तापमानाचा उच्चांक :

राज्यात काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता असली तरी मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या परिसरात उष्ण व दमट वातावरण कायम राहणार आहे. बुधवारी सांताक्रूझ हवामान केंद्रात 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 32.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. गुरुवारी मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

किमान तापमान वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवा कमी होत चालला असून उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात 1 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते. दरम्यान, विदर्भातील अकोला (Akola) येथे बुधवारी 40.7 अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदवण्यात आले असून ते राज्यातील सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)

अवेळी होणारा पाऊस आणि काही भागांमध्ये झालेली गारपीट यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांवर वादळी वाऱ्यांचा परिणाम होऊ शकतो. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आधीच तुरळक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामानातील या बदलत्या परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

News Title: Maharashtra Weather Yellow Alert Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now