हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढील दोन दिवस..

Weather Update Today | जून महिन्यात पावसाने जरा विश्रांती घेतली होती. जुलै महिन्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी (Weather Update Today) यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना , परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नवीन अपडेटनुसार, कोकण, गोवा, कर्नाटकासह किनारपट्टीवर (Weather Update Today) जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. सध्या मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.

लोणावळा येथेही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालीये. इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे. पर्यटक या दृश्याचा आनंद घेत आहेत.

‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Weather Update Today) वर्तवण्यात आली.

याशिवाय, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

News Title : Maharashtra Weather Update Today 5 july 

थोडक्यात बातम्या-

आज ‘या’ 4 राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल!

“साहेब मला माफ करा”, वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज

वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडेवर बुमराहचा लेक, फोटो होतोय व्हायरल

“देशाच्या संसाधनावर आणि शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा”