Maharashtra Weather Update | विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतातील हाता तोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.(Maharashtra Weather Update)
पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडार, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना बसला आहे. हवामान विभागाने आज (10 सप्टेंबर) विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
पूर्व विदर्भात पावसाचे थैमान
गोंदिया जिल्ह्यातही पावसाने दाणादाण उडवली आहे. गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने या परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे. तर, गडचिरोली जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
पश्चिम बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तरी वायव्य दिशेने जात आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात तसेच मराठवाडा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.(Maharashtra Weather Update)
विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज भंडारा , नागपूर , वर्धा , यवतमाळ येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
News Title – Maharashtra Weather Update September 10
महत्वाच्या बातम्या-
सोलापूरात भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?
खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती
राहुल गांधींसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या किंमती?






