पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

On: May 11, 2024 2:57 PM
Maharashtra Weather update May 2024
---Advertisement---

Maharashtra Weather | राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. काही ठिकाणी पाऊस पडून गेलाय. यामुळे तापमानात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. नागरिकांना यामुळे उकाड्यापासून थोडा तरी दिलासा मिळालाय. आता पुढील काही दिवस वातावरण कसं राहील, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यात 15 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी वारा वाहण्याची देखील शक्यता असल्याने नागरिकांना बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचंआवाहन करण्यात आलंय.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

हवामान विभागाकडून पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुण्यात 11 व 12 तर, सातारा येथे 12 तारखेला वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना 15 मे पर्यंत यलो अलर्ट (Maharashtra Weather) देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे गरपीट देखील होऊ शकते.

काल (10 मे) विदर्भासह मराठवाड्यातील अनेक (Maharashtra Weather) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

News Title : Maharashtra Weather update May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ

कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?

अजित पवारांचे विश्वासू नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार?;’त्या’ फोटोमागील सत्य समोर

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस चांगला पडणार

Join WhatsApp Group

Join Now