Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील 24 तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. आज ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आलाय. (Maharashtra Weather Update)
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे अंशतः आकाश ढगाळ राहिल. मात्र, संध्याकाळ / रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 24°C च्या आसपास असेल.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
तर, दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेग) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) यलो अलर्ट जारी केला आहे.पुण्यात काल 22 ऑगस्टरोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. आजही पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामन विभागाने आज धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथेही यलो अलर्ट देण्यात आलाय.(Maharashtra Weather Update)
News Title : Maharashtra Weather Update 23 august 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी..”; संजय राऊतांची जहरी टीका
गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर
आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, काय आहेत सध्या भाव?
नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे; ‘या’ दोन नेत्यांची बिनविरोध निवड!






