मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

On: July 15, 2024 12:45 PM
Maharashtra Weather Update 15 july
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. कोकण भागात तर पावसाने कहर केला आहे. आता पुढील चार ते पाच दिवस या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबई,पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागातही दमदार पाऊस होईल.त्यामुळे रत्नागिरीला दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी आज रेड अलर्ट दिलेला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस तसेच सातारा येथील घाट विभागासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.तसेच रायगड आणि पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

विदर्भामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे (Maharashtra Weather Update ) या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच आज 15 जुलैरोजी चंद्रपूर आणि गडचिरोली व गोंदिया येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात पुढील 48 तास..

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे व परिसरात येत्या 48 तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता (Maharashtra Weather Update ) आहे.

News Title – Maharashtra Weather Update 15 july

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंना भेटणार!

‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत

मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं वक्तव्य; थेट म्हणाले…

रोज सकाळी फक्त एक ग्लास Beetroot Juice पिण्याचे आहेत ‘इतके’ फायदे!

Join WhatsApp Group

Join Now