आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, उर्वरित भागात काय आहे स्थिती?

On: September 13, 2024 11:20 AM
Maharashtra Weather Update 13 september
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अजूनही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)

मात्र, पुणे आणि सातारा येथील घाट विभागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आज कोणत्या ठिकाणी पाऊस बरसणार?

त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

मध्य भारतात सक्रिय असणाऱ्या कमी दाब क्षेत्राने बाष्प खेचून नेल्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता मान्सून परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाला असल्याचं म्हटलं जातंय. मान्सून वाऱ्यांचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा गुजरातपासून कर्नाटकपर्यंत सक्रिय आहे. यामुळे राज्यातील हवामानावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे, तर, किमान तापमानातही वाढ झाल्यामुळं उकाडा वाढला आहे. त्यामुळे सध्या कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण राज्यात दिसून येतंय. आज विदर्भ, मराठवाडामधील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

News Title : Maharashtra Weather Update 13 september

महत्वाच्या बातम्या-

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?

सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

मोठी बातमी! अंबरनाथ MIDC कंपनीत गॅस गळती, केमिकल धूराने नागरिक त्रस्त

देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!

Join WhatsApp Group

Join Now