उद्या 9 एप्रिलला महाराष्ट्रावर दुहेरी संकट! कुठे वाढणार पारा?

On: April 8, 2026 5:49 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील वातावरणात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात उष्णतेची लाट जाणवत होती, मात्र त्यानंतर अचानक हवामानात बदल झाला आणि अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली. आता हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यावर दुहेरी संकट घोंगावत असून काही भागात उष्ण आणि दमट हवामान तर काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार, 9 एप्रिल रोजी राज्यातील काही भागात उष्णतेचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण जाणवू शकते. त्याचवेळी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी कसे असेल राज्यातील हवामान? :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. या भागात दिवसभर उकाडा जाणवू शकतो. तर दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. अचानक होणाऱ्या या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण होण्याची शक्यता असली तरी शेती पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Weather Update | तापमानात होणार बदल :

पुढील चार दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर तापमानात फारसा बदल होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. गुजरात प्रदेशात पुढील 24 तासांत तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला तरी त्यानंतर 2 ते 4 अंशांनी तापमान वाढू शकते.

दरम्यान, किमान तापमानाबाबतही हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमानात 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही भागांत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्यामुळे उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

News Title: Maharashtra Weather Tomorrow: Unseasonal Rain in Some Districts, Hot and Humid Conditions in Konkan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now