सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार

On: September 5, 2024 8:52 AM
Maharashtra Weather News September 5
---Advertisement---

Maharashtra Weather News | विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. शेतीचे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले आहे. पावसामुळे अनेक पिकांना फटका बसलाय. येथे सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. अजूनही अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने आता मुंबई आणि कोकणाला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये पूर्वार्धानंतर म्हणजेच साधारण 15 सप्टेंबरनंतर मॉन्सून हळुहळू मंदावताना दिसेल. त्यापूर्वी पाऊस अनेक भागांना झोडपून काढेल. आज मुंबईला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण-विदर्भात जोरदार बरसणार

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 25 अंश सेल्सिअस इतकं असेल. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होईल.(Maharashtra Weather News)

मराठवड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट

येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरासह नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाने आज 5 सप्टेंबररोजी विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather News)

आज अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि धुळे, नंदुरबार व जळगाव येथे देखील यलो अलर्ट दिलेला आहे.

News Title –  Maharashtra Weather News September 5

महत्त्वाच्या बातम्या-

शिल्पकार जयदीप आपटे सापडला, अटक होताच वकिलांकडून धक्कादायक गौप्यस्फोट

आज ‘या’ राशीवर बरसणार स्वामींची कृपा, दुःख-संकट दूर होणार

लाडक्या बहिणीमुळे सत्तेतल्या 3 भावांमध्येच वाद, अजित पवारांच्या ‘त्या’ करामती कारणीभूत

लाडकी बहीण नेमकी कुणाची?, अजित पवारांना मान्य नाही ‘मुख्यमंत्री’ शब्द?

शुभमन गिलचे ‘या’ अभिनेत्रीसोबतचे ते फोटो व्हायरल, लोक म्हणाले…

Join WhatsApp Group

Join Now