Maharashtra Weather News | गणेश आगमनाच्या दिवशी राज्यात जोरदार पाऊस बरसला होता. आता गणेश विसर्जन झाले आहे. इतक्या दिवस विश्रांतीवर गेलेला पाऊस आता पुन्हा परतणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज 18 सप्टेंबररोजी राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पाऊस पुन्हा हजेरी लावणार
विदर्भाला देखील पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather News)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे आणि बीड येथे पावसाची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील बहुंताश भागांत पावसाच्या सरी कोसळतील.
2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कोसळणार
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या काळात पिकांची काळजी घ्यावी. उडीद, सोयाबीन ही पीकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
News Title- Maharashtra Weather News 18 September
महत्वाच्या बातम्या-
“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
आजचा दिवस संकटांचा, पदोपदी राहावं लागणार सावध;.. ही रास तुमची तर नाही?
पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश
रेल्वेत होतेय बंपर भरती, तरूणांनो सरकारी नोकरीची संधी गमावू नका!
आज ‘या’ राशींवर राहील स्वामींची अपार कृपा, आर्थिक चणचण संपणार!






