अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

On: June 28, 2024 1:04 PM
Weather News
---Advertisement---

Weather News l राज्यातील अनेक भागात मान्सून हजेरी लावत आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडतोय तर काही भागात दांडी मारत असल्याची दिसून येत आहे. मात्र राज्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी देखील पेरणीला सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस :

मात्र आता हवामान विभागाने पावसासंदर्भात माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. आज कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. कोकणताली रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी देण्यात आला आहे.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, आणि वर्धा या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.

Weather News l राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता :

सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र, राज्यातील काही भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला दिसून येत नाही. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर वाढू लागला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र राज्यातील काही भागात पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे त्या भागात शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. यामुळे बळीराजा पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप हव्या तितक्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील त्या भागात शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. मात्र राज्यात चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन देखील कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना केलं आहे.

News Title – Maharashtra Weather News

महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?

बैल खरेदीच्या वादातून झाला गोळीबार, पुढे घडलं भयंकर?

बीड कथित ऑडिओ प्रकरणी ‘या’ दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल

चांदीचे मंदिर, सोन्याच्या मूर्ती! अनंत व राधिकाची लग्नपत्रिका एकदा पाहाच

पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ‘या’ भागातील पब, बारवर फिरवला बुलडोझर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now