Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालंय. यामुळे उष्णतेपासून नागरिकांना बराच दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह अवकाळीचा इशारा दिलाय.
त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवकाळीसह गारपीटीची शक्यता
विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो.आधीच अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसानं झालं आहे, त्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने चिंता अजूनच वाढली आहे.
आज (13 मे) दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला (Maharashtra Rain Alert) पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस पावसाचे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 3 नंतर ताशी 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय.
वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा व वारा खंडित प्रणाली आज विदर्भ मराठवाड्यावरून जात आहे. कोकण,गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Rain Alert) आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title : Maharashtra Rain Alert news update
महत्त्वाच्या बातम्या-
“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं मग भारताला हिंदू..”; कंगनाचं मोठं वक्तव्य
बजरंग सोनवणेंचा धक्कादायक दावा; बीडमध्ये एकच खळबळ
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा






