महाराष्ट्रात मनपा निवडणुकांचा धुरळा उडणार; संभाव्य तारीख आली समोर!

On: December 3, 2025 12:25 PM
Municipal Corporation Election
---Advertisement---

Municipal Corporation Election | महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार असतानाच आता राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. याची संभाव्य तारीखही समोर आली असून आयोगाच्या तयारीला वेग आला आहे.

महापालिका निवडणुका आधी घेण्याची तयारी :

राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांवर आरक्षण मर्यादेचा पेच कायम आहे. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या 17 जिल्हा परिषदांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यावर स्पष्ट मनाई केली आहे. त्यामुळे आयोगाला आपले संपूर्ण वेळापत्रक बदलावे लागले. (Municipal Corporation Election 2025)

न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आता सर्वात व्यवहार्य पर्याय म्हणून महापालिका निवडणुका आधी घेण्याचे नियोजन आयोग करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बहुप्रतिक्षित बीएमसी निवडणुकीची घोषणा देखील याच कालावधीत होणार आहे.

Municipal Corporation Election | जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या :

राज्यातील 32 पैकी 17 जिल्हा परिषद आणि अनेक पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याने आयोग संकटात सापडला आहे. फक्त 15 जिल्ह्यात निवडणुका घेणे आणि 17 जिल्हे थांबवणे शक्य नसल्याने जिल्हा परिषद निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील महापालिका निवडणुका आता जवळपास निश्चित मानल्या जात आहेत. नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्येच आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उर्वरित 27 महापालिका निवडणुका घेणे आयोगासाठी तुलनेने सोपे आहे. (Municipal Corporation Election)

याच कारणामुळे आयोग दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका घेण्यास तयार आहे.

महापालिका निवडणुकीची संभाव्य घोषणा कधी? :

महापालिकांच्या वॉर्डनिहाय अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. आयोग त्या यादीचा आढावा घेतल्यानंतर पुढील 3–4 दिवसांत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…

15 डिसेंबर ते 17 डिसेंबर — मनपा निवडणुकांची अधिकृत घोषणा शक्य.

मनपा निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक :

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीनुसार आयोगाकडे केवळ 50 ते 52 दिवस उरले आहेत. त्यामुळे संभाव्य वेळापत्रक असे असू शकते:

मनपा निवडणुका: 15 डिसेंबर 2025 ते 10 जानेवारी 2026

जिल्हा परिषद व पंचायत समित्या: 5 जानेवारी ते 31 जानेवारी 2026

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमुळे मोठी राजकीय हालचाल सुरू होणार आहे. पक्षांनीही आपल्या रणनीती अंतिम टप्प्यात नेली आहे.

News title : Maharashtra Municipal Corporation Election Date

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now