राज्यात आजपासून आचारसंहिता लागणार? महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार!

On: December 15, 2025 12:54 PM
Election Commission
---Advertisement---

Maharashtra Municipal Election | महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज, सोमवार (१५ डिसेंबर) रोजी संध्याकाळी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील १५ महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांची प्रतीक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आजची राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यास राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. (Zilla Parishad Election Dates)

सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद :

राज्य निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली आहे. आयोगाकडून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, मतदानाची तारीख, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया तसेच आचारसंहितेबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. (State Election Commission Press Conference)

या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा निवडणूक’ असेही म्हटले जाते. कारण या निवडणुकांमधून राज्यातील प्रमुख शहरांचा आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार कोणाच्या हातात जाणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहे.

Maharashtra Municipal Election | १५ महापालिकांचा समावेश, राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात :

राज्य निवडणूक आयोगाच्या संभाव्य कार्यक्रमात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील एकूण १५ मोठ्या महापालिकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या महापालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, उमेदवारांच्या नावांवर चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (Zilla Parishad Election Dates)

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद राज्याच्या राजकीय दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title: Maharashtra Municipal Corporation and Zilla Parishad Election Dates Likely Today, State Election Commission Press Conference

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now