शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार

On: May 17, 2024 8:12 AM
Monsoon
---Advertisement---

Monsoon Update l राज्यात बदलत्या वातावरणामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पाऊस हजेरी लावत आहे. मात्र असं असतानाही राज्यात पाऊस मान्सून कधी हजेरी लावणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र आता हवामान खात्याने यासंदर्भात एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार आहे.

राज्यात अवकाळी पाऊस बरसणार :

यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रातदेखील वेळेवर दाखल होणार आहे. त्यानुसार येत्या 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने दाखल झाला होता. मात्र या वर्षी 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनो जून महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यंदा केरळात मान्सून 31 मे रोजी दाखल होणार आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसणार असल्याची दाट शक्त्यता वर्तवली आहे.

Monsoon Update l यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज :

भारतीय हवामान विभागाने सांगण्यात आले आहे की, यंदाच्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो हा कमजोर होत चालला आहे. आता या निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावर्षी पावासाचा अंदाज जास्त वर्तवण्यात आला आहे.

राज्यात आज देखील मान्सनूपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या जाणार आहेत. अशातच आज मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावणार आहे. याशिवाय पुणे, अहमदनगर, सातारा, महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

News Title – Maharashtra Monsoon Update

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी

अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

महिलांनो बाहेर पडताना बॅगमध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवाच; अन्यथा होईल मोठी पंचाईत

अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now